आम्हां घरीं धन शब्दांचीच रत्नें ।शब्दांचीच शस्त्रें यत्ने करूं ॥१॥
शब्द चि आमुच्या जीवाचें जीवन ।शब्दें वांटूं धन जनलोकां ॥२॥
तुका म्हणे पाहा शब्द चि हा देव ।शब्दें चि गौरव पूजा करूं ॥३॥